वर्षभरात कश्मीरमध्ये 100 दहशतवादी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये रविवारी दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे वर्षभरात ठार केलेल्या दहशतवाद्यांचा आकडा शंभरावर गेल्याची माहिती कश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली. सुरक्षा जवानांनी खात्मा केलेल्या शंभर दहशतवाद्यांमध्ये 30 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी पहिल्या साडेपाच महिन्यांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे मोठे यश आहे. काश्मीरला दहशतवादमुक्त करण्यासाठी सर्क यंत्रणांच्या वतीने काम करण्यात आले आहे.