रत्नागिरीत पहिलीसाठी 12 हजार 206 विद्यार्थी प्रवेश घेणार; बुधवारपासून शाळा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
school-students

उन्हाळी सुटीनंतर बुधवारपासून शाळा पुन्हा एकदा गजबजणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचे वाजतगाजत स्वागत करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके प्रदान करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या दिवशी पहिलीत 12 हजार 206 विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. त्यामध्ये 6,230 मुले आणि 5,976 मुलींचा समावेश आहे.

यंदाच्या वर्षातील बुधवार शाळेचा पहिला दिवस असून विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून स्वागत होणार आहे. यावेळी काही शाळांमध्ये प्रवेश दिंडीचेही आयोजन करण्यात आले आहे. शालेय पोषण आहारांतर्गत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 1 लाख 10 हजार 658 विद्यार्थ्यांना 6 लाख 13 हजार 054 पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश करणाऱ्या नवागतांचे स्वागत करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 12 हजार 206 विद्यार्थी पहिलीत प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारे विद्यार्थी 533 असून त्यापैकी मुलगे 283आणि मुली 250, दापोली तालुक्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारे एकूण विद्यार्थी 1,351 असून त्यापैकी मुलगे 693 आणि मुली 658, खेड तालुक्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारे एकूण विद्यार्थी 1358 असून त्यापैकी मुलगे 693 आणि मुली 665, चिपळूण तालुक्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारे विद्यार्थी 1922 असून त्यापैकी मुलगे 1005 आणि मुली 917, गुहागर तालुक्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारे एकूण विद्यार्थी 991 असून त्यापैकी मुलगे 487 आणि मुली 504, संगमेश्वर तालुक्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल हॊणारे एकूण विद्यार्थी 1303 असून त्यापैकी मुलगे 659 आणि मूली 644, रत्नागिरी तालुक्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारे एकूण विद्यार्थी 2288 असून त्यापैकी 1151 मुलगे आणि 1137 मुली, लांजा तालुक्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारे एकूण विद्यार्थी 878 असून त्यापैकी मुलगे 452 आणि मुली 426, राजापूर तालुक्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारे एकूण विद्यार्थी 1280 असून त्यापैकी 640 आणि मुली 640, नगर परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारे एकूण विद्यार्थी 202 असून त्यापैकी मुलगे 167 आणि मुली 135 असे एकूण 12206 विद्यार्थी पहिलीच्या वर्गात प्रविष्ठ होणार आहेत. त्यामध्ये 6230 मुलगे आणि 5976 मुलींचा समावेश आहे.

मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासन अनुदानित शाळांमधील सर्व मुला-मुलींना पाठ्यपुस्तकाचा पुरवठा करण्यात येतो या अंतर्गत जिल्ह्यात एकूण 6 लाख 13 हजार 054 पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात एकूण 27,565 पुस्तके वितरीत करण्यात आली असून या विद्यार्थ्यांची संख्या 5,693 आहे. दापोली तालुक्यात 11,851 लाभार्थी विद्यार्थी असून याठिकाणी 55,967 पाठ्यपुस्तके वितरीत झाली आहेत. खेड तालुक्यात 62,8154 पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली असून लाभार्थी विद्यार्थी संख्या 10,506 आहे. चिपळूण तालुक्यात एकूण 78,753 पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली असून विद्यार्थ्यांची संख्या 17,960 आहे. गुहागर तालुक्यात 9,136 विद्यार्थी असून याठिकाणी 53,644 पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. संगमेश्वर तालुक्यात 73,485 पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली असून याठिकाणी 12,531 विद्यार्थी आहेत. रत्नागिरी तालुक्यात 1 लाख 41 हजार 830 पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली असून याठिकाणी 23,883 विद्यार्थी आहेत. लांजा तालुक्यात 48,631 पाठ्यपुस्तक वितरीत करण्यात आली असून याठिकाणी 8,259 विद्यार्थी आहेत. राजापूर तालुक्यात 11,799 लाभार्थी विद्यार्थी असून या ठिकाणी 70,365 पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आले आहेत अशी जिल्ह्यात एकूण 6 लाख 13 हजार 054पाठ्यपुस्तक वितरीत करण्यात आली असून 1 लाख 10 हजार 618 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे.