
सामना ऑनलाईन । मुंबई
कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजमध्ये एका १४ वर्षाच्या मुलीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. हर्षिका धिरेंद्र मायावशी असे त्या मुलीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मुलीला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हर्षिका ही ठाकूर व्हिलेजमधील गारडेनिया अपार्टमेंटमध्ये राहते. तिने गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आरकेड बिल्डिंगच्या आठव्या माळ्यावरून उडी मारली. ती उडी मारत असताना खाली असेलल्या लोकांनी आरडाओरड करून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तिने कुणाचेही ऐकले नाही व उडी मारली. उडी मारल्यानंतर घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. हर्षिताच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत.





























































