
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
2018 साली हिंदुस्थानमध्ये 162 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षात हा आकडा सर्वाधिक असून मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो.
गेल्या वर्षी मध्य प्रदेशमध्ये 22 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामध्ये बहुतांश आरोपींवर लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. मध्य प्रदेश सरकारने गेल्या वर्षी 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कार करण्यार्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद केली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 16 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर कर्नाटकचा आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. दोन्ही राज्यात प्रत्येकी 15 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्व आकडेवारी दिल्लीतील राष्ट्रीय कायदा विद्यापीठाने एका अभ्यासाअंतर्गत जाहीर केली आहे.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने 11 प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा सुनवणी होते. 2012 साली निर्भया बलात्काराप्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. गेल्या वर्षी ज्या ज्या राज्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा नाही दिली त्यात जम्मू कश्मीर, गोवा, आसाम सह ईशान्येकडील सहा राज्यांचा समावेश आहे.


























































