
1993मध्ये पाच शहरांत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची अजमेरच्या टाडा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 6 डिसेंबर 1993 रोजी लखनौ, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि मुंबई या पाच शहरांत एकापाठोपाठ एक साखळी बॉम्बस्पह्ट करण्यात आले होते.
– 28 फेब्रुवारी 2004 रोजी टाडा कोर्टाने 16 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सुप्रीम कोर्टाने चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती, तर उर्वरित आरोपींच्या शिक्षा कायम ठेवल्या होत्या.
– अब्दुल करीम ऊर्फ टुंडा हा उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील पिलखुवातील आहे. येथे तो सुताराचे काम करायचा. नंतर मुंबईत कपडय़ांच्या दुकानात काम केले.



























































