अल्पवयीन मुलीच्या ओठावर शंभर रुपयांची नोट फिरवणे पडले भारी, रोमियोला तुरुंगवासाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीच्या ओठावरुन 100 रुपयांची नोट फिरवत…का एवढी भाव खातेस म्हणणाऱ्या रोडरोमियोला मुंबईच्या विशेष पॉक्सो अॅक्ट न्यायालयाने तरुणाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. 2017 च्या एका प्रकरणावर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या घटनेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला.

पोलिसांनी या प्रकरणात  विनयभंग आणि लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. मात्र 32 वर्षाच्या तरुणाला शिक्षा ठोठावताना न्यायालयाने या गोष्टीकडेही लक्ष वेधले की तरुणाचे कुटुंब त्याच्यावर निर्भर आहे आणि त्याची आई कर्करोग ग्रस्त आहे. विशएष न्यायाधीश एससी जाधव यंनी सांगितले की, हे न्यायालयाचे कर्तव्य आहे की, त्यांनी अपराधाचे गांभिर्य आणि शिक्षेची मागणी लक्षात घेऊन शिक्षा द्यावी.

विशेष सरकारी वकील वीना शेलार यांनी आरोपीला शिक्षा देण्यासाठी ज्यांचा हवाला दिला. त्यामध्ये मुलगी, तिची आई आणि शेजारी सहभागी आहेत. सोळा वर्षीय मुलीने न्यायालयाला सांगितले की, 13 जुलै 2017 रोजी रात्री 8 वाजता ती आपल्या शेजाऱ्यासोबत बाजारात गेली होती. दरम्यान त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. तिला रस्त्यात अडवून तिच्याजवळ गेला. त्याने तिच्या ओठांवर 100 रुपयांची नोट फिरवली.

अल्पवयीनने सांगितले की, जेव्हा तिने आरोपीकडे रागाने पाहिले त्यावेळी तू असे का करत आहेस, एवढा भाव का खात आहेस. त्यानंतर मुलीने घडलेला प्रकार घरी येऊन सांगितला. त्यानंतर आई-मुलगी ठाण्याला पोहोचले आणि त्या तरुणाविरोधात एफआयआर दाखल केली. अल्पवयीन मुलीने सांगितले की, आरोपी ती कॉलेजमध्ये जाताना तिचा पाठलाग करायचा. तो तिला पाहून शिटी वाजवायचा आणि कॉमेण्ट पास करायचा. एवढेच नाही तर तिच्या आईला चाकूने मारण्याची धमकीही दिली होती. या मुलीच्या शेजारच्यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे.