
सामना प्रतिनिधी । एकुरका
वाढवणा बु. येथून जवळच असलेल्या एकुरका येथील तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हनमंत जाधव (२०) असे या तरुणाचे नाव असून तो नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. त्याने मंगळवाकी सायंकाळी सहा वाजता वाढवणा शिवारातील बाबु सूर्यवंशी यांच्या शेतात पळसाच्या झाडाला स्कार्पने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, शेतमालक बाबु सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून वाढवणा ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळीधाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गफ्फार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट जमादार शिवाजी बेल्लाळे करीत आहेत.




























































