3128 ग्रॅम गांजा व 27 ग्रॅम एमडी जप्त, 14 गुन्हे दाखल, 19 आरोपींविरुद्ध कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी ड्रग्जविरोधात धडक कारवाया केल्या. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकूण 14 गुन्हे दाखल करून 19 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच यावेळी पोलिसांनी 3128 ग्रॅम गांजा व 27 ग्रॅम एमडीचा साठा जप्त केला.

अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये पोलीस ठाणे अभिलेखावरील आरोपीच्या विरोधात कारवाई करण्याकरिता सोमवारी रात्री विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एनडीपीएस गुह्यातील अभिलेखावर असलेले एकूण 115 आरोपी तपासण्यात आले. तर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकूण 14 गुन्हे दाखल करून 19 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवेळी 3128 ग्रॅम गांजा व 27 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.