
अवकाळी पावसामुळे मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं खूपच नुकसान झालं. आज पडलेल्या अवकाळी पावसामुळे कोरपना तालुक्यातील बिबी शेत शिवारात वीज पडून 36 बकऱ्यांचा मृत्यू झाला.
मृत बकऱ्या जब्बार खाजा मिया कुरेशी यांच्या मालकीच्या आहेत. मृत झालेल्या जनावरांमध्ये 18 बकऱ्या आणि 18 मेंढ्या आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.



























































