
चोरलेले मोबाईल विकण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी चार युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीचे 32 मोबाईल आणि एक दुचाकी असा 3 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
एका मोटार सायकल स्वारास अडवून जबरीने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे 392, 34 भादवि (दुखापत करून लुटणे, लुटण्याचा प्रयत्न करणे) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी सुरू केली होती. 08/05/2023 रोजी पोलीस पथकाला प्रफुल प्रकाश पवार, वय 23 वर्ष, राहणार गिरवलकर नगर, लातूर आकाश भरत बिराजदार, वय 24 वर्ष, राहणार न्यू भाग्यनगर, लातूर. प्रद्युम्न उर्फ सोन्या सतीश माळी, वय 25 वर्ष, राहणार गातेगाव, शोएब महबूब पाशा शेख, वय 23 वर्ष ,राहणार वाल्मिकी नगर लातूर. यांना लातूर शहरातील संविधान चौक परिसरात त्यांनी चोरलेले मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत असताना ताब्यात घेतले.
त्यांनी लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटर सायकल वरून तसेच पायी जाणाऱ्या इसमांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल जबरीने लुटले आहे, असे कबूल करून ताब्यातील चोरलेले एकूण 32 मोबाईल गुन्हे करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,07,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, राजेश कंचे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, जमीर शेख, तुराब पठाण, नितीन कठारे आणि नकुल पाटील यांनी केली आहे.



























































