
सामना ऑनलाईन । मनिला
फिलीपीन्समधील मॅबिनी कॉम्पोस्टेला व्हॅली जवळील समुद्रात तटरक्षक दलाला एक मृत व्हेल मासा आढळून आला. या माशाचे शवविच्छेदन केले असता त्याच्या पोटातून तब्बल 40 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आले. पोटात प्लास्टिकचा साठा झाल्याने या व्हेल माशाने गेल्या काही दिवसापासून काही खाल्ले नव्हते. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पर्यावरण रक्षक संघटना अनेकदा प्लास्टिकच्या वापराचा समुद्री जीवनावर परिणाम होत असल्याचे सांगत असतात. या मृत व्हेल माशाच्या निमित्ताने समुद्रातील भयंकर परिस्थिती जगासमोर आली आहे.
फिलीपीन्समध्ये प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हे प्लास्टिक वापरानंतर समुद्रात फेकले जाते. त्यामुळे महासागर प्रदुषित करणारा देश म्हणून फिलिपिन्स ओळखले जाते.





























































