कवठे परिसरात 50 जनावरांना लम्पीची लागण, महिन्याभरात 3 जनावरांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई, सविंदणे परिसरात मागील महिन्याभरात सुमारे 50 जनावरे लम्पी आजाराने ग्रस्त असून याच आजाराने 3 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती कवठे येमाई पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय मुने यांनी दिली. परिसरातील जवळपास सर्वच जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लास देण्यात आली असून अजून ही काही शेतकऱ्यांची जनावरे ही लस देण्याचे बाकी असतील तर तात्काळ लसीद घेण्याचे आवाहन ही शासकीय पशुवैद्यक डॉ.मुने यांनी केले आहे.

कवठे येमाई परिसरात बिबट्यांची प्रचंड दहशत असल्याने त्यांच्या तावडीत जनावरे सापडू नयेत म्हणून शेतकरी विविध संरक्षणात्मक उपाय योजना करण्यात व्यस्त असतानाच या भागात जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराने शिरकाव करीत सुमारे 50 जनावरांना लागण झाल्याने अनेक पशुपालक,गोपालक शेतकरी धास्तावले आहेत. त्यातच मागील एक महिन्यात परिसरात तीन जनावरे या आजाराने दगावल्याची बाब चिंता वाढविणारी आहे.आपल्या जनावरांना हा आजार जडू नये म्हणून शेतकऱयांनी आपल्या जनावरांची अधिकाधिक काळजी व सुरक्षितता घेण्याचे आवाहन ही डॉ. मुने यांनी केले आहे.