मुजफ्फरपुरमध्ये सुरक्षारक्षकावर गोळ्या झाडून 52 लाख रुपये लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुजफ्फरपूर

बिहारमधील मुजफ्फरपूर येथे बँकेची रोकड घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर दरोडा टाकून 52 लाखांची रोकड लुटली आहे. यावेळी अज्ञात दरोडेखोरांच्या गोळीबारात व्हॅनमधील एक सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. विनोद सिंह असे जखमी सुरक्षारक्षकाचे नाव असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.

गुरुवारी सकाळी मुजफ्फरपूरमधील सराई परिसरात एका टोल नाक्यावर अॅक्सिस बँकेची व्हॅन दरोडेखोरांनी लुटली. दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकावर गोळीबार करून त्याच्याकडील बंदुकीसह 52 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.