मुंबईत 52 लसीकरण केंद्रे बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत शुक्रवारी कोरोना लसीच्या तुटवडय़ामुळे 52 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. ज्या केंद्रांवर लसीचा साठा शिल्लक होता, अशा केंद्रांवर केवळ दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या व्यक्तींना लस देण्यात येत होती. नव्याने लस घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती निराश होऊन घरी परतत होत्या. दरम्यान, महापालिकेला शुक्रवारी रात्रीपर्यंत लसीचा साठा मिळणार आहे. तो साठा उद्या सकाळपर्यंत लसीकरण केंद्रांवर पोहोचवला जाणार आहे. त्यामुळे आज लसीकरण केंद्रांवर लसीकरण उशिरा सुरू होईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.