मराठी पाटी लावण्यास दिरंगाई; 625 जणांना कोर्टाचा दणका, 50 लाख रुपयांचा दंड वसूल

मराठी पाटय़ा लावण्यास दिरंगाई करणाऱया 625 जणांना न्यायालयानीय दणका मिळाला आहे. पालिकेने वारंवार आवाहन करूनही मराठी पाटय़ा लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱयांना न्यायालयात खेचल्यानंतर सुमारे 50 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. गेल्या फक्त 15 दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने क आस्थापनांकर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. असे असूनही मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱया दुकाने व आस्थापनांना 1 मे 2024 पासून मालमत्ता कराइतक्या रकमेचा दंड ठोठावण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. या इशाऱयाचा योग्य परिणाम मागील पंधरा दिवसांत आढळून आला आहे.

अशी झाली कारवाई

n महानगरपालिका प्रशासनाकडे सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणांपैकी 403 प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यातून एकूण 38 लाख 28 हजार रुपयांचा दंड संबंधित दुकाने व आस्थापना व्यावसायिकांना ठोठावण्यात आला आहे.
n न्यायालयात 565 प्रकरणांकर सुनावणी होऊन 43 लाख 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर महानगरपालिका प्रशासनाकडे 60 प्रकरणांमध्ये सुनावणी होऊन 6 लाख 42 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

मराठी पाटी नसल्यास पालिकेला कळवा

एकढेच नक्हे तर मागील पंधरा दिवसांत तपासणी करण्यात आलेल्या 1,281 पैकी 1,233 आस्थापनांकर दुकानांवर मराठी भाषेतील, देवनागरी लिपीतील नामफलक योग्यरीत्या प्रदर्शित झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, जिथे मराठी नामफलक लागलेले नाहीत, अशी दुकाने व आस्थापना आढळून आल्यास त्यांची माहिती नागरिकांनी महानगरपालिकेला द्याकी, असे आवाहनदेखील यानिमित्ताने महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.