
प्रसिद्ध चित्रकार, 75 वर्षीय शोभा शेटे यांचा ‘इमोशन्स इन वॉटर कलर’ हा कलाविष्कार बघण्याची संधी कलारसिकांना मिळणार आहे. 18 ते 24 ऑक्टोबरदरम्यान वरळी येथील डॉ. ऍनी बेझंट रोडवरील नेहरू सेंटर एसी आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
‘इमोशन्स इन वॉटर कलर’मध्ये 45 चित्रे असून मानवी भावभावनांचा हा संगम आहे. धोतर नेसून अभिमानाने उभे असलेले वृद्ध गृहस्थ, लग्नाच्या दिवशी आनंदाने उजळलेली लाजरी स्त्राr, उत्सवात ढोल वाजवणारा उत्साही इसम, चेहऱयावर प्रेमळ हास्य दाखवणारी छोटी मुलगी, स्वतःच्याच विचारांच्या जगात गुंतलेला चिंताग्रस्त मुलगा अशी विविध चित्रे प्रदर्शनात आहेत. याविषयी शोभा शेटे म्हणाल्या, मी कायमच लोकांच्या चेहऱयावरील विविध भावना आणि हावभावांनी प्रभावित झाले आहे. त्यातून माझ्यातील उत्कट आवड जागृत होते. मी माझ्या कॅनव्हासवर अशा अनेक क्षणांना रेखाटले आहे. माझ्या कार्यक्रमाचे शीर्षकही तसेच आहे.
वॉटर कलर हे माध्यम परिणामकारक तसेच कठीण आणि आव्हानात्मक असल्याचे शेटे यांनी सांगितले.





























































