75 वर्षांवरील नागरिकांचे घरोघरी जाऊन कोविड लसीकरण करा! हायकोर्टात याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

वृद्धत्वामुळे कोविड लसीकरण केंद्रात जाणे शक्य नसल्यामुळे 75 वर्षे व त्यावरील नागरिकांना घरोघरी जाऊन कोविडची लस देण्याचे केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच महापालिका प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोविड लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे तसेच अपॉईंटमेंट घेणे आवश्यक असून प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ऑनलाइन नोंदणी करणे जमेलच असे नाही. याशिवाय अशा केंद्रांवर लसीकरणासाठी तीन ते चार तास वाट पहावी लागते.

घरोघरी कोविड लसीकरण सेवेमुळे ज्येष्ठ नागरिकांची तसेच अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध नागरिकांची गैरसोय टळेल व त्यांना त्याचा फायदा होईल असा दावा करत अॅड. धृती कपाडिया आणि अॅड. कुणाल तिवारी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.