डायनोसॉरच्या सांगाडय़ाचा लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इतिहासात पहिल्यांदाच डायनोसॉरच्या सांगाडय़ाचा लिलाव होणार आहे. या लिलावात हा सांगाडा किमान 55 कोटी 98 लाख रुपयांना विकला जाईल असा अंदाज बांधला जात आहे. गॉरगॉसॉरस प्रजातीचा हा डायनोसॉर जवळपास 76 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होता. 10 फूट उंच आणि 22 फूट लांब अशा या डायनोसॉरचा सांगाडा 2018 साली अमेरिकेतील माँटाना भागात सापडला होता. या सांगाडय़ाचा लिलाव साऊथबाय कंपनी करणार असून 28 जुलै रोजी न्यूयॉर्कमध्ये हा लिलाव होणार आहे.

पृथ्वीवर 16 कोटी वर्षांपूर्वी डायनासॉरचे अस्तित्व होते. कालांतराने हा प्राणी पृथ्वीवरून अदृश्य झाला. गेल्यावर्षी ब्रिटनच्या संशोधकांनी डायनासॉरचे जीवाश्म सापडल्याचा दावा केला होता.