
कोरोनाच्या महामारीनंतर रिअल इस्टेट क्षेत्र आता हळूहळू सावरताना दिसत आहे. मुंबईत 2022 मध्ये 85 हजार 169 घरांची विक्री झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ 35 टक्के अधिक आहे. नाइट फ्रँक इंडियाने नुकताच त्यांचा ‘इंडिया रिअल इस्टेटः 2022’ हा अहवाल सादर केला आहे. जुलै-डिसेंबर या कालावधीसाठी आठ प्रमुख शहरांमधील निवासी व कार्यालयीन बाजारपेठ कामगिरीचा आढावा यात घेण्यात आला आहे.





























































