उरमोडी धरणातून 881 क्युसेकने विसर्ग, कोयनेसह प्रमुख धरणांमध्ये 50 टक्के पाणीसाठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून, दुष्काळी पट्टय़ात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. दमदार पावसामुळे कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी, उरमोडी आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पश्चिमेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगांत पावसाचे धुमशान सुरूच असल्याने कोयनेसह प्रमुख धरणांमधील सरासरी पाणीसाठा 50 टक्क्यांच्या उंबरठय़ावर आला आहे. उरमोडी धरणातील पाणीसाठा आज 63.63 टक्क्यांवर गेल्याने धरणाचे चार वक्र दरवाजे उचलून त्यातून 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उत्तरमांड प्रकल्पाच्या सांडव्यावरून कोणत्याही क्षणी प्रवाह सुरू होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिह्याच्या पश्चिम भागात पावसाचे थैमान सुरू असले, तरी कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. दुष्काळी पट्टय़ात मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. सातारा, कराड, वाईसह पश्चिम भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घात नसल्यामुळे खरिपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून, रस्त्यांची वाट लागली आहे. कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत कोयनानगरला 107 (आजअखेर 1782), नवजाला 59 (2180), तर महाबळेश्वरला 143 (2317) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी पाच वाजता धरणांतील पाण्याची आवक 50 हजार 993 क्युसेकवर गेली असून, पाणीसाठय़ात 4.23 टीएमसीने वाढ झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवणक्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा आता 48.94 टीएमसीवर गेला आहे. धरणपायथा विद्युतगृहातून सध्या कोयना नदीपात्रात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सातारा जिह्यातील उरमोडी धरण पाणलोटक्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात मोठय़ा प्रमाणात पाण्याची आकक होत आहे. धरणातील पाणीपातळी निर्धारित पाणीपातळीपेक्षा अधिक झाल्यामुळे धरणातून आज सकाळी 11 काजता परिसरातील नागरिकांना पूर्कसूचना देऊन कक्रद्वार क्रमांक 1 आणि 4 हे 0.50 मीटरपर्यंत आणि कक्रद्वार क्रमांक 2 आणि 3 हे 0.25 मीटरपर्यंत टप्प्याटप्प्याने उचलून धरणातून एकूण 881 क्युसेक किसर्ग उरमोडी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पर्जन्यमान काढल्यास धरणातून आणखी किसर्ग सोडण्यात येणार आहे.