
सामना ऑनलाईन । कोलकाता
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स टेलिकॉम आणि याच कंपनीचे एक युनिट असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या सर्व 144 बँक खात्यांमध्ये आजपर्यंत केवळ 19 कोटी 34 लाख रुपयेच शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड या दोन कंपन्यांविरुद्ध अमेरिकेतील बोस्टनमधील अमेरिकन टावर कॉर्प या कंपनीने 230 कोटी रुपयांचा दावा दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेला आहे. या दाव्यासंदर्भात या दोन्ही कंपन्यांतर्फे कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून ही माहिती समोर आली आहे.
























































