
सामना ऑनलाईन । मुंबई
99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली आहे. गज्वी यांची ओळख ही मराठी आणि हिंदुस्थानमध्ये एक प्रयोगशील आणि विचारवंत नाटककार अशी आहे.
प्रेमानंद गज्वी यांनी किरवंत, देवनवरी सारखी नाटके लिहून समाजातील दुर्लक्षित विस्थापितांची बाजू मांडली. तर गांधी-आंबेडकर नाटकातून त्यांनी दोन महापुरुषांचा संघर्ष रेखाटला आहे. तर हवे पंख नवे हा आंबेडकरांवर त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.
एकतारी हा कविता संग्रह, लागण आणि ढीवर डोंगा हे कथासंग्रह, जागर ही कादंबरी तसेच बोधी कला संस्कृती आणि सगुण आणि निर्गुण हे वैचारिक ग्रंथ प्रकाशित आहेत.
मामा वरेकर, अनंत काणेकर, आचार्य अत्रे, गो.ब देवल, किर्लोस्कर दया पवार आणि वि.वा शिरवाडकर पुरस्काराने त्यांच्या सन्मान झाला असून त्यांना चार वेळा राज्य वाडःमय पुरस्कार मिळाला आहे.





























































