123 बेपत्ता मुलांची घरवापसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

हरवलेल्यांचा शोध घेण्याकरिता मुंबई पोलिसांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे 123 बेपत्ता मुलांची घरवापसी झाली आहे. घरवापसी झालेल्यांमध्ये 59 मुले, 64 मुलींचा आणि 24 बालकामगारांचा समावेश आहे.

अभ्यासाचा कंटाळा, कौटुंबिक वाद आणि अन्य कारणात्सव लहान मुले घर सोडून निघून जातात. हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्याच्या पालकांपर्यंत पोहचवणे हे कठीण असते. कित्येकदा बेपत्ता मूल सापडल्यावर पालक पोलिसांना कळवत नाहीत. घरातून पळाल्यावर मुले रस्त्यावर राहतात. तेथे राहिल्यावर ते व्यसनाच्या आहारी जातात. कित्येकदा मुले घरचा पत्ताही सांगत नाहीत. अशा वेळी मुलांना विश्वासात घेऊन त्याची विचारपूस करावी लागते. बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण पाहता मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम हाती घेतली होती. तर हरवलेल्या मुलाचा शोध घेण्याकरिता तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पांडे मॉडेल राबवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.

असे राबवले ऑपरेशन

मुंबई पोलिसांनी 20 फेब्रुवारी ते 5 मार्च या काळात शहरात ऑपरेशन मुस्कान राबवले होते. ऑपरेशन मुस्कान दरम्यान जास्तीत जास्त बेपत्ता मुलांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱयांना देण्यात आल्या होत्या. बेपत्ता मुलांचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी एक कृती आराखडा तयार केला होता. कारवाईपूर्वी पोलिसांनी अभ्यास केला. जेथे मुलांना भिक्षा मागायला लावतात, अशी ठिकाणे पोलिसांनी शोधून काढली. तसेच काही रेल्वे स्थानक परिसरात मुले भिक्षा मागताना आढळून येतात, अशा रेल्वे स्थानकांची यादी पोलिसांनी तयार केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी बेपत्ता असलेल्या 123 मुलांचा शोध घेतला आहे. त्यात 59 मुले आणि 64 मुलींचा समावेश असल्याचे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले. लहान मुलाप्रमाणे मुंबईमधील झोपडपट्टय़ांमध्ये राबणाऱया 24 बालकामगारांचीदेखील सुटका केली आहे.

मुंबईमध्ये साधारण

10-18 वयोगटातील 30 जण रोज होतात बेपत्ता.

2015-2017 दरम्यान ऑपरेशन मुस्कानमध्ये 20,112 मुलांचा पोलिसांनी घेतला होता शोध.

वर्ष बेपत्ता शोधले
2013 179 131
2014 2527 2461
2015 1580 1472
2016 1903 1774
2017 2249 2035