
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलीवूडमध्येही रकुल प्रीत सिंगने नाव कमावलं आहे. गेल्या काही वर्षांत तिने स्वत:च्या स्टाईलकडे विशेष लक्ष दिल्याने तिला स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळालं आहे. रकुलने नुकतंच एका मासिकासाठी फोटोशूट केलं आहे. यातील फोटोंमुळे ट्रोलर्सनी तिच्यावर घाणेरड्या शब्दात ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

रकुलने फॅशनजगतातील मासिक ‘एले’ साठी फोटोशूट केलं होतं. निळ्या रंगाच्या बॉडीसूटमध्ये तिचे फोटो काढण्यात आले आहेत.पायात लाल रंगाचे हिल्सवाले बूट आणि बॉडीसूटवर पांढऱ्या रंगाचं जॅकेट अशा अवतारात रकुल दिसते आहे. फोटोशूटसाठी रकुलने जे कपडे परिधान केले होते ते नामांकीत ब्रँड Christian Louboutin ने तयार केलेले आहेत.

रकुलने घातलेले कपडे अत्यंत स्टायलिश आणि ग्लॅमरस होते. मात्र तिच्या या कपड्यांवर ट्रोलर्सने वाईट -साईट प्रश्न विचारत ट्रोल केलं. काही ट्रोलर्सनी तिला ट्रोल करताना ‘पैशांसाठी काय काय करावं लागतं’ असंही म्हटलं आहे.
रकुलला ट्रोल करणाऱ्यांपेक्षा तिचे फोटो आवडल्याचे आणि ती सुंदर दिसत असल्याची प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या पोस्ट अधिक आहेत.





























































