अत्यावश्यक सेवेच्या प्रवासासाठी पास मिळणार; याआधी दिलेला पास वैध राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आणि शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना नवीन अत्यावश्यक सेवेच्या प्रवासासाठी पास पाहिजे असल्यास तो त्यांना मिळविता येणार आहे.

यापूर्वी वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना अतिमहत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास करावयाचा होता तेव्हा त्यांना मुंबई पोलीस दलाकडून अत्यावश्यक सेवेच्या प्रवासासाठीचा पास देण्यात आला होता. त्या पासवरील वैध दिनांक कालावधी संपुष्टात आलेला असला तरीही तो पास प्रवासाकरिता वैध राहील असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच ज्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना नवीन अत्यावश्यक सेवेच्या प्रवासासाठी पास आवश्यक असेल त्यांनी तो पास ते राहावयास असलेल्या परिसरातील सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) यांच्या कार्यालयातून मिळविता येणार आहे.