
‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ फेम मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन झाले आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये त्यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
माधवी गोगटे यांनी अनेक मराठी आणि हिंदी टीव्ही मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका साकरल्या होत्या. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ या मराठी नाटकांसह ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. मराठीसह ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी लक्षवेधक भूमिका साकारल्या होत्या.

































































