
जावयाने सासऱ्याला शिव्या दिल्या. त्याचा जाब विचारत मेहुण्याने जावयाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.
दिलीरकुमार गुप्तेश्वरनाथ पांडे (33, रा. वडगाव मावळ) असे मारहाण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेहुणा रोहित राजेंद्रनाथ जयस्वाल (रा. पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पांडे हे त्यांच्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरी आले होते. त्यावेळी मेहुणा रोहित याने माझ्या वडिलांना शिवीगाळ का केली, असे म्हणून हॉकी स्टिकने पांडे यांच्या पाय, हात, कमरेवर, मांडीवर मारून जखमी केले. त्यानंतर पांडे गाडीवरून पडले असता त्यांच्या पायाला गाडीच्या सायलेन्सरने भाजून जखम झाली. याप्रकरणी सांगवी पोलीस अधित तपास करीत आहेत.





























































