शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा 117चे शाखाप्रमुख इंद्रजीत गवस व साईबाबा ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 171 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आमदार सुनील राऊत, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, माजी महापौर दत्ताजी दळवी, म्युनिसिपल कामगाल सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, नगरसेविका सुवर्णा करंजे, नगरसेवक उपेंद्र सावंत, आप्पा राऊत, उपविभाग प्रमुख अनंत पाताडे, परम यादव, संदीप सावंत, युवासेनेचे योगेश पेडणेकर, मयूर गाडे, बाबू ठाकूर, सुधाभाई पेडणेकर, विजय तोडणकर, शाखाप्रमुख दीपक सावंत, रवींद्र महाडिक, अभय राणे, तानाजी मोरे, शंकरनाना ढमाले, राजोल पाटील, मामा मांचेकर, सचिन चोरमुळे, स्वप्नील सावंत, गोटय़ा परब, सचिन सावंत, उर्मिला लोके उपस्थित होते.

समारंभ आयोजक नियोजक कामगार सेनेतील कॅटरिंग, मंडप डेकोरेशन, फन अॅण्ड फेअर जत्रासारख्या कामगारांसाठी 2 लाखांपर्यंतचा अपघाती विमा काढण्यात आला. अध्यक्ष समृद्ध शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या विम्याचे वाटप आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या वतीने माथाडी कामगारांचा सत्कार सोहळा तसेच माथाडी कामगार भित्ती शिल्पाच्या कामाचे भूमिपूजन आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, उपविभाग प्रमुख विनायक सामंत, माथाडी कामगार सेनेचे अरुण पवार उपस्थित होते.