
महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात एका मालिकेतील कलाकाराला पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र शेलाजी पोळ (वय 32, रा. कळंबा जेल परिसर, कोल्हापूर)असे अटक केलेल्याचे नाव आहे.
‘शादी डॉट कॉम’ या वेबसाइटच्या माध्यमातून व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संबंधित महिलेशी ओळख झाल्यानंतर जितेंद्र पोळ याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. महिलेच्या नकारानंतरही ती काम करीत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन विनयभंग केला. त्या महिलेने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा पोळविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सहायक फौजदार राजेंद्र कलगुटकर तपास करीत आहेत.




























































