सुंदर दिसण्यासाठी शरीराच्या प्रत्येक भागावर शस्त्रक्रिया, तरुणीची झालीय अशी अवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण सुंदर दिसावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी काही जण चांगली जीवनशैली आत्मसात करतात तर काहीजण कॉस्मेटिक सर्जरीची मदत घेतात. अशीच सर्जरी करण्याच्या नादात एका तरुणीने स्वतःच्या शरीराची वाट लावून घेतली आहे.

मेरी मॅगडालेन असं या तरुणीचे नाव आहे. तिला सर्जरी करून घेण्याचं व्यसन आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणारं नाही. तिने आतापर्यंत शरीरच्या प्रत्येक अवयवावर शस्त्रक्रिया केली आहे. यात तिचं नाक, चेहरा, फॅट ट्रान्सफर, लायपोसेक्शन, बट इंजेक्शन, बट लिफ्टींग अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

इतकंच नव्हे तर गुप्तांगाचीही तिने शस्त्रक्रिया करवून घेतली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या जिवावर बेतण्याची परिस्थिती ओढवली होती. मात्र, तिने त्यानंतरही शस्त्रक्रिया करवून घेणं सुरूच ठेवलं. सध्या मेरी ही 25 वर्षांची आहे. तिने वयाच्या 21व्या वर्षापासून कॉस्मेटिक सर्जरी करून घ्यायला सुरुवात केली. तिला आता आपली कितवी सर्जरी आहे, हेही आठवत नाही.

पुढच्या आठवड्यातही मेरीवर अजून एक शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेला आयब्रो ट्रान्सप्लान्ट म्हटलं जातं. त्यानंतर ती हनुवटी आणि ओठांवर शस्त्रक्रिया करेल. या सगळ्या शस्त्रक्रिया ती रशियात करवून घेईल. कारण, अमेरिकेत तिला या शस्त्रक्रियांसाठी परवानगी मिळणार नाही.