पत्नीला माहेराहून घरी आणण्यासाठी गेलेल्या पती आणि त्याच्या मामाला कोयत्याने मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील माहेराहून आपल्या पत्नीला घरी आणण्यासाठी गेलेल्या पती व त्याच्या मामाला तीन जणांनी लोखंडी रॉड आणि कोयत्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय अनिल चव्हाण शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पढेगाव तेथे आपल्या पत्नीला माहेराहून घरी आणण्यासाठी गेला होता. याचा राग आल्याने आरोपी पांडुरंग भारम भोसले, धीरज भारम भोसले, शाम बडोद भोसले यांनी लताबाई भोसले यांच्या घरासमोर विजय चव्हाण व तक्रारदार विजयचे मामा दीपक भोसले या दोघांना लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच ठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबत दीपक भोसले यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.