कात्रज तलावात महिलेचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कात्रज तलावात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला असून मृतावस्थेत आढलेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. भारती विद्यापीठ पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्यात येत आहे.

कात्रज तलावात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे सुरक्षारक्षकाने पाहिले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात महिलेने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.