कुर्रर्रर्रर्र….हनीप्रीतचे नामकरण, पॅरोलवर सुटलेल्या बाबा रामरहीमने केले पुन्हा बारसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा रामरहीम हा सध्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला आहे. बाहेर येताच त्याने पहिले काम केले ते म्हणजे त्याची खास साथीदार हनीप्रीत हिचे नाव बदलण्याचे. बाबा राम रहीम याने हनीप्रीतचे नाव बदलून रुहानी दिदी केलं आहे. हनीप्रीत हिचं मूळ नाव प्रियंका तनेजा असून तिचं नाव दुसऱ्यांदा बदलण्यात आलं आहे. हनीप्रीतने 1996 साली बाबा रामरहीम याला पहिल्यांदा पाहिलं होतं. हनीप्रीत तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होती आणि 11 वीत शिकत होती. बाबा रामरहीम विद्यार्थिनींना आशिर्वाद देण्यासाठी आला होता आणि तेव्हाच त्याची नजर प्रियंका उर्फ हनीप्रीतवर पडली होती.

बाबा राम रहीमला अटक झाल्यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. पोलिसांनी विदेशात जाऊनही तिचा शोध घेतला होता. 6 वेळा पोलिसांना चकवा देणाऱ्या हनीप्रीतला तब्बल 38 दिवसांनी हरयाणा पोलिसांनी अटक केली होती. पॅरोलवर सुटलेल्या बाबा राम रहीम याला डेऱ्याच्या गादीवर पुढे कोण बसणार असा प्रश्न विचारला असता त्याने तोऱ्यात उत्तर दिले की गादीवर आम्हीच असून यापुढेही आम्हीच राहू. बाबा रामरहीम याने उत्तर प्रदेशातील बागपतमधल्या बरनावा आश्रमात आयोजित सत्संग कार्यक्रमात हनीप्रीतचे नाव बदलत असल्याची आणि गादीवर आपणच राहणार असल्याची घोषणा केली.