
>> शिवानी दिनेश गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
सामान्यांपासून बॉलीवूडपर्यंत सगळय़ांना खुणावणारी साडी ही स्त्रीचे सौंदर्य खुलविण्यासाठी नेहमी सज्ज असते. कपडय़ांची फॅशन नेहमीच बदलत असते. मात्र साडीचे स्थान प्रत्येक क्षेत्रात अढळ राहिले आहे.
साडय़ांचे निरनिराळे प्रकार असतात. मात्र प्रत्येकाच्या अंगकाठीप्रमाणे त्याची निवड केली तर ती त्या स्त्र्ााrला जास्त शोभून दिसते. जास्त जाड अंगकाठी असलेल्या स्त्र्ायांनी जर कॉटनच्या फुलणाऱया साडय़ा नेसल्या तर त्या आणखी जाड दिसू शकतात. अशा वेळेस तिने जर पातळ तलम किंवा सिल्कची साडी नेसली तर तिची अंगकाठी जास्त सुरेख दिसू लागेल. प्रत्येक समाजाप्रमाणे, प्रांताप्रमाणे साडी आणि तिच्यावर घालण्याचे दागदागिने किंवा अलंकार हे बदलत असतात. साडी हा खरं तर प्रत्येकाचा परंपरागत पेहराव असला तरी आजच्या फॅशनच्या दुनियेतही साडीचे स्थान वरचे आहे. फॅशन आणि ग्लॅमरमुळे ती आपल्याला जास्त आपलीशी वाटू लागली आहे.
आकर्षक पैठणी
पैठणी सोन्याने आणि रेशमापासून हाताने विणली जाते. अस्सल पैठणीची वीण ही दोन्ही बाजूला अगदी सारखी असते. याचे कुठलेही धागे लटकताना दिसत नाहीत किंवा बाहेर आलेले दिसत नाहीत. या साडीच्या ट्रडिशनमध्ये साधारण 28 इंच पदराची डिझाइन येते, तर ब्रोकेड पैठणीमध्ये 40 इंचाची पदराची डिझाइन येते. ज्यांना पैठणी परवडत नाही, त्यांच्यासाठी सेमी पैठणी हा उत्तम पर्याय आहे. चंद्रकला ही काळय़ा रंगाची असून त्याची बॉर्डर लाल रंगाची असते, तर शिरोळक ही पांढरी असते. फिरोज ही हिरवा, पांढरा आणि लाल यांचे मिश्रण असलेली असते आणि कुसुंबी ही जांभळय़ा व लाल रंगाची असते. मुनिया ब्रोकेड पोपटाची, कमळाची, बांगडी मोर हा मोर बांगडीच्या आकारात विणलेला असतो. तसेच पैशांचे चिन्ह, हंस, कापसांची फुले, पंजा, भूमिती आकार, फुले, चांदण्या अशा विविध डिझाइन्स या पैठणीच्या पदरावर दिसतात.
पारंपरिक दागिन्यांचा साज
पैठणीवर ठुशी, कोल्हापुरी साज अथवा मोत्यांच्या दागिन्यांचा सेटही या साडीवर शोभून दिसतो. पारंपरिक नथ किंवा सध्या मिळत असलेल्या वेगवेगळय़ा आकाराच्या नथी या साडीवर खास शोभून दिसतात. टेम्पल ज्वेलरीने ही पारंपरिक लुक दिसू शकतो. कमीत कमी दागिने किंवा गळय़ाभोवतीचा चोकर आणि एखादा सुंदर लांब दागिना असेही दागिने या साडीवर खुलून दिसतात.
खास मेकअप
या साडीवर फार भडक मेकअपची आवश्यकता नसते. तरीही खास कार्यक्रमांसाठी किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी तुमचा मेकअपचा फाउंडेशनचा बेस थोडा ग्लॉसी किंवा हेवी ठेवू शकता. तसेच ग्लिटर आयशॅडो किंवा नॅचरल आयशॅडो या साडीवर सुंदरच दिसतात. या साडीवर डोळय़ांवरील आयलाइनर मात्र विंग आयलाइनर लावल्यास डोळे जास्त आकर्षक दिसतील. काजळ वापरून तुम्ही त्याचे सौंदर्य जास्त वाढवा. लिपस्टिकचा रंग डार्क लाइट किंवा तुमच्या पैठणीच्या रंगाचाही तुम्ही लावू शकता. गालांवरील रुजचा वापर मात्र हलकासा करा. आयब्रोला छान व्यवस्थित शेप देऊन चांगले रंगवा. खास समारंभासाठी आयलॅशेसचा वापरा करा. कपाळावरील चंद्रकोर तुमच्या पारंपरिक पेहरावाला एका वेगळय़ाच उंचीवर नेईल.




























































