
मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पॅम्पसमध्ये जोरदार निदर्शने केली. विविध मागण्यांसाठी 2 फेब्रुवारीपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असून आज विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लंच टाईममध्ये निदर्शने केली. सुधारित सेवांतंर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुन्हा लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठांतंर्गत येणाऱ्या परीक्षांवर बहिष्कारही टाकला आहे.



























































