कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात आणि राज्यात सलग दुसऱया दिवशी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आज देशात 6 हजार 660 कोरोना रुग्ण सापडले तर 24 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक 11 मृत्यू केरळमध्ये झाले तर राज्यात तीन मृत्यूंची नोंद झाली. दरम्यान, सक्रिय रुग्णांची संख्याही 67 हजारांवरून 63 हजार 380वर पोहोचली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज 722 कोरोना रुग्ण सापडले तर तिघांचा मृत्यू झाला.

मुंबईत 191 रुग्ण, एकाचा मृत्यू
मुंबईत दिवसभरात 191 रुग्ण सापडले तर एकाचा म्त्यू झाला. मृत व्यक्ती ही 76 वर्षीय वृद्धा असून तिला उच्च रक्तदाब, किडनी विकार असे दीर्घकालीन आजार होते. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली असून ती 1 हजार 235वर पोहोचली आहे.