#CryPMPayCM ट्विटरवर नवा ट्रेंड; प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर मिळाला तुफान प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Priyanka-Gandhi-Narendra-modi

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी रविवारी कर्नाटकातील बागलकोट येथे एका मतदान सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. विरोधी पक्षांनी दिलेल्या शिव्या मोजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुलकडून काहीतरी शिकावे, असा टोला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी यांना लगावला होता. त्यानंतर काही मिनिटांनी, #CryPMPayCM ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला.

‘CryPMPayCM’ या हॅशटॅगसह अनेक यूझर्सनी ट्विटरवर मीम्स, व्हिडीओ आणि मीडिया रिपोर्ट्स शेअर केले.

एका युजरने लिहिले की, ‘Cry PM शिवाय PayCM अपूर्ण होता, भाजपचा फ्लॉप शो आता पूर्ण झाला आहे’.

दुसर्‍या युजरने प्रियंका यांचे त्यांनी केलेल्या प्रतिवादाबद्दल कौतुक केलं आणि म्हटलं, ‘प्रियंका गांधी यांनी मोदींना जबरदस्त शैलीत परतफेड केली’.