
आजही मोठ्या प्रमाणात सासरच्या मंडळींकडून सुनेचा छळ केल्याच्या अनेक घटना घटना घडत आहेत. श्रीरामपूरमध्ये अशीच एक घटना घडली असून सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहीत महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, 29 वर्षीय छाया अतुल कणसे यांचा सासरी नेहमी छोट्या-मोठ्या कारणांमुळे छळ होत होता. काही दिवसांपुर्वी तिला मारहाण सुद्धा करण्यात आली होती. सतत होणारा छळ आणि मारहाणीमुळे पीडिता नैराश्यामध्ये होती. बुधावर दि.10 जानोवारी रोजी सकाळच्या सुमारास सासरच्या लोकांनी पुन्हा एकदा भांडण उकरुन काढले त्यामुळे नैराश्यात असणाऱ्या विवाहीतेने टोकाचे पाऊल उचलत थेट प्रवरा नदी घाटली. प्रवरा नदीवरील वळदगाव बंधाऱ्यावरुन पाण्यात उडी घेत विवाहीतेने आपले जीवन संपवले.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विवाहीतेचा मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तरुण मुलीने आत्महत्या केल्यामुळे माहेरच्या लोकांनी रुग्णालचा परिसर दणाणून सोडला आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. जोपर्यंत सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा इशारा माहेरच्या नातेवाईकांनी दिला आहे.






























































