
हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आता अचूक होणार आहे. कारण हवामान खाते आता स्वदेशी बनावटीचे ‘भारत फोरकास्ट सिस्टीम (बीएफएस)चा वापर सुरू करणार आहे. यंदाच्या पावसाळय़ात ‘बीएफएस’ मॉडल कार्यान्वित करण्यात येणार आहे.
सध्या आयएमडीकडून मान्सून मिशन प्रोजेक्टअंतर्गत विकसित केलेली कपल्ड फोरकास्टिंग सिस्टीम (सीएफएस) चालवली जाते. याव्यतिरिक्त ते ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टीम (जीएफएस) देखील चालवते, जे काही तासांपासून ते पाच दिवसांपर्यंत, एका महिन्यापासून एका हंगामापर्यंतच्या वेळेच्या प्रमाणात हवामान अंदाज जारी करण्यासाठी एक संयुक्त मॉडेल (महासागर आणि वातावरणीय पॅरामीटर्समधील घटक) आहे.
- ‘बीएफएस’ हे हिंदुस्थानातील पहिले स्वदेशी बनावटीचे हवामान मॉडेल आहे. ते एक निश्चित मॉडेल आहे, म्हणजेच ते एकल-मॉडेल आधारित आऊटपुट असेल, असे आयआयटीएमचे माजी वरिष्ठ हवामान मॉडेलर पार्थसारथी मुखोपाध्याय म्हणाले. सध्याचे मॉडेल या 144 चौरस किमी क्षेत्र युनिटमधील लहान भागात घडणाऱया हवामान घटना निवडण्यास असमर्थ आहे. कारण अतिवृष्टीच्या घटना आणि एकूणच हवामानातील तीव्रता वाढत आहे, असे मुखोपाध्याय म्हणाले. 6 किमीपर्यंत सुधारित अवकाशीय रिझोल्यूशनमुळे अंदाज सुधारण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
- पुण्यातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (आयआयटीएम) द्वारे ही यंत्रणा विकसित करण्यात आली असून 6 किमी बाय 6 किमी एवढे उच्च रिझोल्यूशन असलेले पहिले हवामान मॉडेल बनले आहे.