
ऋतू कोणताही असो आपल्याला केसांची काळजी घेणे हे गरजेचे असते. हिवाळ्यात कोरडेपणामुळे त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. या काळात केस गळणे आणि तुटणे मोठ्या प्रमाणात वाढते. मुख्य म्हणजे हिवाळ्यात केसांची चमक देखील कमी होते. अशावेळी केसांची चमक कमी होऊन, केस निस्तेज आणि कोरडे होतात. याकरता केसांना अंडे लावणे हे फार फायद्याचे आहे.
केसांसाठी अंडी का फायदेशीर आहेत?
अंडी केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. त्यात मुबलक प्रमाणात प्रथिने, बायोटिन आणि जीवनसत्त्वे असतात, जे निरोगी केस राखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. ते नैसर्गिक कंडिशनर म्हणून देखील काम करते, केस गुळगुळीत आणि रेशमी ठेवते.
बाजारातून कांदे बटाटे आणल्यावर अशापद्धतीने ठेवायला हवेत, वाचा
अंडी आणि मध हेअर मास्क
हिवाळ्यात कोंडा आणि केस गळण्याची समस्या वाढते. निरोगी केसांसाठी मध आणि अंड्याचा हेअर मास्क हा योग्य उपाय आहे. याकरता अंड्यामध्ये मध पूर्णपणे मिसळा. हे मिश्रण तुमच्या केसांवर २० ते ३० मिनिटे राहू द्या. नंतर सौम्य शाम्पू आणि स्वच्छ पाण्याने केस धुवा. यामुळे टाळू हायड्रेट राहील आणि केसांची वाढही उत्तम होण्यास मदत मिळेल.
अंडी आणि ऑलिव्ह ऑइल
एका अंड्यात २ चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि द्रावण तयार करा. हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांना लावा आणि अर्धा तास तसेच राहू द्या. त्यानंतर, कोमट पाण्याने तुमचे केस धुवा. यामुळे तुमचे केस मॉइश्चरायझ होतील, केस गळणे कमी होईल आणि त्यांची नैसर्गिक चमक टिकून राहील.
दिवसभर उर्जावान राहण्यासाठी आपल्या आहारात कोणती फळे समाविष्ट करायला हवीत, वाचा
कोरफड आणि अंडी
केस गळती रोखण्यासाठी आणि केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी तुम्ही कोरफड आणि अंडी वापरू शकता. हे करण्यासाठी, ताजे कोरफड जेल घ्या आणि ते अंड्यामध्ये मिसळून एक द्रावण तयार करा. हे मिश्रण तुमच्या केसांवर ३० मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. यामुळे केसांची मुळे मजबूत होतील आणि ते गुळगुळीत, रेशमी आणि चमकदार होतील.
मेथीदाणे केसांच्या पोषणासाठी कशाप्रकारे उपयुक्त ठरतात, जाणून घ्या



























































