
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा यंदा गतवर्षीच्या तुलनेत 12 दिवस आधीच, 19 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. यासाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात नाव नोंदणी सुरू केली जाणार आहे. सध्या उत्तराखंडमध्ये मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी दीड ते दोन फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. सर्वात आधी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडतील. त्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे उघडतील.
24 लाख करदात्यांचे रिफंड अडकले
देशातील एकूण 8.80 कोटी करदात्यांनी 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आयटी रिटर्न फाईल केले आहेत. यातील जवळपास 24 लाख 64 हजार करदात्यांना अद्याप रिफंड मिळाले नाहीत. 1.11 कोटी लोकांनी रिटर्न अपडेट केले आहे. यामुळे सरकारला 6,976.5 कोटी रुपयांचा अतिरिक्त कर मिळाला आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिली आहे. रिफंड रखडण्यामागे बरीच वेगवेगळी कारणे असू शकतात.
सोमवारी जेईई मेन सेशन 1 चा निकाल
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने जेईई मेन सेशन-1 च्या निकालाची घोषणा केली आहे. हा निकाल 16 फेब्रुवारीला जाहीर केला जाणार आहे. याआधी अशी चर्चा होती की, 12 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. परंतु आता निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. एनटीएने यावर्षी जेईई मेन्स 2026 सेशन-1 ची परीक्षा 21 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत 10 शिफ्ट्समध्ये आयोजित केली होती. 13 लाखांहून अधिक उमेदवारांनी इंजिनीअरिंग कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयआयटी जेईई नोंदणी केली होती. उमेदवार एनटीएची अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर निकाल पाहू शकतील.
अपहरण झालेल्या दाम्पत्याची सुटका
अमेरिकेला जाण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करणाऱ्या आणि अझरबैजानमध्ये अपहरण झालेल्या गुजरातमधील दाम्पत्याची हिंदुस्थानी दूतावासाने अवघ्या 24 तासात सुटका केली. ध्रुव पटेल आणि त्यांची पत्नी दीपिका हे दाम्पत्य गुजरातच्या आणंद जिह्यातील आहेत. हे दोघे एका एजंटच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे अमेरिकेला जात असताना त्यांचे अझरबैजानच्या बापूमध्ये खंडणीसाठी अपहरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना 51 लाखांपर्यंतचे पॅकेज
भुवनेश्वर येथील केआयआयटी डीम्ड टू बी विद्यापीठात 2025 बॅचसाठी झालेल्या पॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना 92.5 टक्के प्लेसमेंट मिळाली आहे. यामध्ये 757 हून अधिक पंपन्यांनी 5 हजार विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 621 विद्यार्थ्यांना नोकरी दिली आहे. यात मायक्रोसॉफ्ट कंपनीने 51 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज दिले. टीसीएसने 530 आणि विप्रोने 342 विद्यार्थ्यांना नोकरी दिली. याशिवाय, 1209 विद्यार्थ्यांना पेड इंटर्नशीप मिळाली.

























































