मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आणणार महाभियोग; विरोधकांची एकी, 193 खासदारांच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी विरोधक महाभियोग प्रस्ताव दाखल करण्याच्या तयारीत असून विरोधी पक्षांच्या एकूण 193 खासदारांनी त्यावर स्वाक्षऱया केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राप्त माहितीनुसार, हा प्रस्ताव शुक्रवारी लोकसभा किंवा राज्यसभेपैकी एका सभागृहात दाखल केला जाऊ शकतो.

निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी विरोधी पक्षांचे खासदार एकटवले आहेत. आयुक्तांना हटवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावर लोकसभेतील 130 आणि राज्यसभेतील 63 खासदारांनी स्वाक्षऱया केल्याची माहिती आहे. या प्रस्तावावर खासदारांनी मोठय़ा उत्साहाने स्वाक्ष्रया केल्या. महाभियोग प्रस्तावावर लोकसभेतील किमान 100 आणि राज्यसभेच्या किमान 50 सदस्यांच्या स्वाक्षऱया आवश्यक आहेत.