
पृथ्वीवर सुरांच्या चांदण्याचं अलौकिक देणं बरसून स्वरचंद्रिका स्वर्गाच्या दिशेने निघाली. तिला अलविदा करताना भावना अनावर झाल्या, शब्द गोठले आणि सूरही गहिवरले. अथांग समुद्र आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ‘आशा भोसले अमर रहे’चा जयघोष मुखातून निघाला. आशाताईंच्या शब्दांत सांगायचे तर ‘आशा कधी संपत नाही’!

आशाताईंना अखेरचा निरोप देताना भावुक झालेल्या त्यांच्या धाकट्या भगिनी उषा मंगेशकर.

अभिनेता रितेश देशमुख यांनी लोअर परळ येथील आशाताईंच्या निवासस्थानी हजेरी लावत श्रद्धांजली अर्पण केली.

सुप्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांनी आदरांजली वाहिली.

लाडकी नात जनाई झाली भावूक
आशा भोसले यांना अखेरचा निरोप देताना त्यांची लाडकी नात जनाई भोसले हिला अश्रू अनावर झाले. जनाई आणि आशाताई यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. जनाई अनेकदा सोशल मीडियावर आजीसोबतचे आनंदी क्षण, फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. केवळ घरातच नाही, तर सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही या दोघींचा वावर लक्ष वेधून घ्यायचा. एका भावूक क्षणी अभिनेत्री तब्बू तिचे सांत्वन करताना.
सिनेदिग्दर्शक सुभाष घई यांनी आठवणी जागवल्या.

भागोजी कीर स्मशानभूमीत मंगेशकर कुटुंबियांना धीर देताना अभिनेते राकेश रोशन.

जनाई भोसलेंचे सांत्वन करताना अभिनेता रणवीर सिंग.

प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांनी आशाताईंना अखेरचा निरोप दिला.

क्रिकेटपटू मोहम्मद सिराज, गायक सुदेश भोसले व महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

आशाताईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना शोकाकूल ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर.





























































