गंभीर यांनी बदलली पंतची फलंदाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऋषभ पंत हा सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आयपीएलमध्ये तर त्याच्या बॅटला गंज चढला होता. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटला समोरे जाताना पंतच्या फलंदाजीत भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बदल केल्याचे समोर आले आहे. पंत हा बऱ्याचदा हवेत फटके मारतो आणि त्यामुळे तो लवकर बाद होत असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे आता कसोटी सामना खेळण्यापूर्वी गंभीर यांनी पंतच्या फलंदाजीत बदल करताना त्याला हवेत फटके न मारण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर पंतकडून जास्तीत जास्त जमिनीलगत फटके मारण्याचा सराव गंभीर यांनी पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी करून घेतला आहे. त्यामुळे गंभीर यांनी फलंदाजी शैलीत केलेला बदल पंतसाठी किती महत्त्वाचा ठरतो याची उत्सुकता सर्वांना असेल.