
बीसीसीआय आता भारताच्या क्रिकेटपटूंसाठी नवी रिटायरमेंट पॉलिसी बनवत असल्याचे समोर आले आहे. कारण भारताचे खेळाडू परदेशी लीगमधून खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटमधून थेट संन्यास घेत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच विजय शंकरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. विजय भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर लगेच श्रीलंका प्रीमिअर लीगमध्ये दाखल झाला होता. अशा क्रिकेटपटूंची संख्या वाढत असल्याने बीसीसीआय आता नवीन पॉलिसी बनवणार असल्याचे समोर आले आहे.


























































