
नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाकडून सर्वसामान्य नागरिकांचा अमानुष छळ सुरू असल्याचा आरोप करत नांदेडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी अनेक तक्रारदार नागरिकांनाच पोलीस ठाण्यातच हातपाय बांधून मारहाण केली, असा गंभीर आरोप हणमंतभाऊ ठाणेकर आणि सचिन पाटील–इगोले यांनी केला. त्याचे पुरावेही त्यांनी समोर ठेवले.
मुखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सट्टा बाजार, अवैध रेती वाहतूक, गांजाचा व्यवसाय अशा अवैध धंद्यांना ऊत आला आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणारे प्रकार सुरू आहेत. अशा परिस्थितीत अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून अमानुष छळ केला जात आहे, असा सामाजिक कार्यकर्ते हणमंतभाऊ ठाणेकर आणि सचिन पाटील-इगोले यांचा आरोप आहे. त्यांनी भर उन्हात न्यायासाठी आझाद मैदानात लढा सुरू केला आहे. मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करावे, सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेला अमानुष छळ तत्काळ थांबवावा, तक्रार देण्यासाठी गेलेल्या लोकांना मारहाण करीत पैसे उकळण्याचे प्रकार बंद करावेत, अशी मागणी उपोषणकर्त्या ठाणेकर आणि पाटील-इगोले यांनी केली आहे.
राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात कायदा–सुव्यवस्थेपुढे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटना पुढे येत आहेत. नांदेड जिह्यातील मुखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाकडून सर्वसामान्य नागरिकांचा अमानुष छळ सुरू आहे. निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी अनेक तक्रारदार नागरिकांनाच हातपाय बांधून मारहाण केली, असा गंभीर आरोप करीत नांदेडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
मुखेड शहरासह तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर सट्टा बाजार, अवैध रेती वाहतूक, गांजाचा व्यवसाय अशा अवैध धंद्यांना ऊत आला आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणारे प्रकार सुरू आहेत. अशा परिस्थितीत अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून अमानुष छळ केला जात आहे, असा आरोप करीत नांदेड येथील हणमंतभाऊ ठाणेकर आणि सचिन पाटील-इगोले या सामाजिक कार्यकर्त्यांनी भर उन्हात न्यायासाठी आझाद मैदानात लढा सुरू केला आहे. मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करावे, सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेला अमानुष छळ तत्काळ थांबवावा, तक्रार देण्यासाठी गेलेल्या लोकांना मारहाण करीत पैसे उकळण्याचे प्रकार बंद करावेत, अशी मागणी उपोषणकर्त्या ठाणेकर आणि पाटील-इगोले यांनी केली आहे.
पोलीस निरीक्षकाला भाजप नेत्यांचा आशीर्वाद
अत्याचाराने त्रस्त नागरिकांनी पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्याविरुद्ध देगलूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून मंत्रालयातील गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांपर्यंत पत्रव्यवहार केला आहे, मात्र सरकारने लक्ष्मण केंद्रे यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यांना सत्ताधारी भाजप नेत्यांचाच आशीर्वाद आहे. त्या नेत्यांच्या आशीर्वादातून केंद्रे यांनी अत्याचाराची मालिका लावली आहे, असा आरोप ठाणेकर यांनी केला.
सरकारने निरीक्षकाला पाठीशी घातल्यास आत्मदहन करू! उपोषणकर्त्यांचा इशारा
मुखेडच्या सामान्य नागरिकांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर तातडीने कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करीत सामाजिक कार्यकर्त्यांचे मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही उपोषणाची दखल घेतली नाही, अशी नाराजी सचिन पाटील-इगोले यांनी व्यक्त केली. सरकार आणि गृह खात्याने पोलीस निरीक्षकाची पाठराखण केली तर पीडित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आत्मदहन करू, असा इशारा इगोले यांनी सरकारला दिला.
‘लाडक्या बहिणी’लाही पोलीस ठाण्यात मारहाण
आखरगा येथील भाजीपाला विक्रेता महिला माधुरी नामावळे यांनी आझाद मैदानातील उपोषण स्थळ गाठले असून पोलीस ठाण्यात त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची व्यथा मांडली. विभक्त पतीविरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी ठाण्यात गेली होती, त्यावेळी तेथे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पोलीस ठाण्यात बांधून ठेवले आणि बेदम मारहाण केली, असे नामावळे यांनी सांगितले. त्यांनीही केंद्रे यांच्यावर कारवाईसाठी देगलूरपासून गृह खात्यापर्यंत तक्रार केली आहे.




























































