असं झालं तर… ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेटच्या विस्तारामुळे घरबसल्या आरोग्य विमा खरेदी करणे सोपे झाले आहे. मात्र, विमा एजंट नसल्यामुळे अनेकदा तांत्रिक गोष्टी समजून घेताना चुका होतात.

लहान चुकांमुळे आणीबाणीच्या वेळी तुमचा विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो. केवळ कर सवलत मिळवण्यासाठी विमा न घेता, तो घेताना कुटुंबाची सुरक्षा बघा.

अनेक ग्राहक केवळ कमी प्रीमियम पाहून पॉलिसी निवडतात. मात्र, स्वस्त प्लॅनमध्ये अनेकदा रूम रेंट कॅपिंग, सब-लिमिट आणि को-पेसारख्या कडक अटी असतात.

प्रपोजल फॉर्म भरताना जुने आजार, शस्त्रक्रिया किंवा सुरू असलेली औषधे यांची माहिती लपवू नका. बहुतेक पॉलिसींमध्ये ओपीडी खर्च समाविष्ट नसतो.

विमा घेण्यापूर्वी तुमच्या शहरातील प्रमुख रुग्णालये त्या कंपनीच्या ‘नेटवर्क हॉस्पिटल’मध्ये आहेत का हे तपासा. कॅशलेस सुविधेमुळे खिशातून पैसे न भरता उपचार घेणे सोपे होते.