
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश अमेरिका आणि देशातील दोन उद्योगपती यांना विकला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शनिवारी केला.
देशात सध्या हुकूमशाही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ज्यांना घाबरतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. देशासाठी काम करणाऱ्या लोकांना नजरपैदेत ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. भाजपने पेंद्रात सत्ता मिळाल्यानंतर विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या पक्षांनाही त्यांनी संपवले. हे लोकशाहीसाठी घातक आहे. जनमताचा आदर करणे सरकारचे काम असते, पण त्यांनी हे केले नाही. भाजप ही लोकशाहीविरोधी व्यवस्था आहे. याची नोंद जनतेने घेतली पाहिजे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.
भाजपला सत्तेचा माज आलाय
हे सरकार भ्रष्टचारी आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप केला जात आहे. मतदारांना विकत घेणे, धमकावणे, गुंडाराज आणण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. भाजपला सत्तेचा खूप माज आला आहे, तो इतका जास्त आहे. कायम सत्तेत राहण्यासाठी जाती-जातींमध्ये वाद लावण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. सध्या जनतेमध्ये भाजप आणि सरकारविरोधात मोठा राग आहे, असेही ते यावेळी म्हणाले.


























































