
इंधन दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल, महागाई हटाव, मोदी हटाव, शिवसेना जिंदाबाद च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत महागाई, इंधन दरवाढ, फसवी कर्जमाफी विरोधात शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फेरा मारला, महिलांनी गॅस सिलिंडरला हळदीकुंकू वाहून त्याचे पुजन केले, तर फसवी कर्जमाफीविरोधात शासन निर्णयाची होळी करून निषेध केला.
केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ, वाढलेली महागाई आणि शेतकर्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ‘महंगाई के अच्छे दिन’ जनआक्रोश आंदोलन केले. शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला सायकवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फेरी मारण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत शहर दणाणून गेले. महागाई रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल, इंधन दरवाढ रद्द करा, शिवसेना जिंदाबाद, जय भवानी-जय शिवाजी च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सिलिंडर समोर ठेऊन महिलांनी लाटण्यांची थाळ्या वाजवल्या. त्यानंतर डिजेवर महागाईचे गाणे टाळांच्या गजरात वाजवले.
रणरागिणींनी केले सिलिंडरचे पुजन
शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी आंदोलन स्थळी सिलिंडरला हळदी-कुंकू व फुले वाहून सिलिंडरला ओवाळून त्याचे पुजन केले. गॅस दरवाढ एवढी केली की आता सिलिंडर खरेदी करणे परवडणारे न राहिल्याने ठेवूनच देण्याची वेळ आल्याचे रणरागिणींनी सांगितले.
गॅस सिलिंडर घेऊन मारला फेरा
क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन फेरा मारला. महिलांनी थाळ्या वाजवून व जोरदार घोषणाबाजी करीत गॅस दरवाढीचा निषेध केला.
कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी
राज्य शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी केली. फसवी कर्जमाफी करण्यात आली असून ही तर कर्जवसूलीसाठीचा शासन निर्णय आहे. फसवी कर्जमाफी रद्द करा, शेतकर्यांना कर्जमुक्त करा, सातबारा कोरा करा या घोषणा देण्यात आल्या. सलीम वाहेगावकर या आंदोलनात शिवसेना उपनेते सुभाष पाटील सहसंपर्कप्रमुख राजेंद्र काळे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, संतोष खेंडके, मनोज पेरे, मनोज गायके, किशोर कच्छवाह, बबन तात्या जाधव, विठ्ठल बदर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, सलीम वाहेगावकर, तालुकाप्रमुख विष्णू जाधव, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, प्रदीप ठाकरे, मंगेश भाले, नारायण जाधव, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, वीरभद्र गादगे, जयसिंग होलिये, शिवाजी आपरे, सतीष कटकटे, रामेश्वर कोरडे, ज्ञानेश्वर ताठे, महिला आघाडीच्या दुर्गा भाटी, सुकन्या भोसले, छाया देवराज, प्राजक्ता भाले, मनिषा ठाकरे मीना फसाटे, सुनीता सोनवणे, भागूआक्का शिरसाठ, सुनंदा खरात, अॅड. धर्मराज दानवे, विठ्ठल डमाळे, उमेश मोकासे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

























































