तामीळनाडूत भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे तामीळनाडू उपाध्यक्ष करू नागराजन आणि राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय आणखी किमान 15 पदाधिकाऱ्यांनी पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे.